बंद

राष्ट्रीय मतदार दिन

प्रकाशन तारीख : 07/02/2024

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जालना येथील श्री. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात कार्यक्रम

जालना- 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली  गुरुवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता जालना येथील श्री. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान जालना जिल्हा दिव्यांग स्वीप आयकॉन निकेश मदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले. याशिवाय मतदार नोंदणीच्या अनुषंगाने उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी व संस्थांना पुरस्कार वितरीत करण्यात आले. मतदारांसाठी प्रतिज्ञेचे सार्वजनिक वाचन यावेळी केले गेले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

NVD