बंद

पर्यटन

धार्मिक स्थळे व पर्यटन –

जालना जिल्हयात महत्वाची/प्रसिध्द पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर प्रसिघ्द असुन, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास 400 वर्षापूर्वीचा चौघाडा व कल्याणस्वामींचा म्दंग तसेच वेणूबाईचा तानपूरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. मराठवाडयातील अष्टविनायकापैकी एक गणपती राजुर येथे आहे. जाम तालुका घनसांवगी येथे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदीर ही आहे. हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पही आहेत. शिवाय रऊनापराडा ता. अंबड येथे प्रसिध्द दर्गा असुन तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो.

कसे पोहोचाल

महत्वाची ठिकाणे

संस्कृती आणि वारसा

पर्यटन स्थळे