बंद

गुरू गणेश तपोधाम

दिशा

जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश भवन हे एक महत्‍वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश भवन हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्‍थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्‍टमार्फत या धार्मीक स्‍थळाची देखरेख व विकासाची कामे केली जातात. या ट्रस्‍टमार्फत शालेय संस्‍थान, महाविद्यालय, अंधांची शाळा, ग्रंथालय, गोशाला चालविल्‍या जातात. संस्‍थानची गोशाला ही मराठवाडयामध्‍ये सर्वात मोठी गोशाला आहे.

कसे पोहोचाल? :

विमानाने  

जालना शहरामध्ये हवाई सुविधा नाही. सर्वात जवळचे विमानतळ चिकलथाना औरंगाबाद आहे.
जालना पासुन 64 किमी दूर चिकलथाना विमानतळ (आयएक्सयू), औरंगाबाद आहे.

रेल्वेने

देशातील इतर प्रमुख शहरांमधून जालना येण्या – जाण्यासाठी नियमित गाड्या सहजपणे मिळू शकता.
रेल्वे स्थानक: जालना

रस्त्याने  

देशातील इतर प्रमुख शहरांपासून जालनापर्यंत नियमित बस आहेत.
बस स्थानक: जालना