ताजी बातमी
शासन आपल्या दारी – जालना मित्र चॅटबॉट
+91 73879 38774

जिल्ह्याची ओळख
जालना जिल्हा स्वतंत्र भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. तसेच मराठवाडयाच्या उत्तर दीशेस स्थीत आहे.
जालना जिल्हा हा पुर्वी निझाम राज्याचा भाग होता. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर छ. संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्हयामधील जालना एक तालुका झाला.
जालना हा छ. संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद)चा पुर्वेकडील तालुका 1 मे 1981 रोजी जिल्हा म्हणून स्थापीत झाला, व छ. संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्हयातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुका व परभणी जिल्हयातील परतूर असे पाच तालुके जिल्हयामध्ये समावेश करण्यात आले. जालना जिल्हयाच्या पुर्वेस परभणी व बुलढाणा जिल्हा स्थित आहे, छ. संभाजीनगर पश्चीम दीशेला आहे, तसेच जळगाव उत्तरेकडे असून दक्षीणेस बीड जिल्हा आहे.
जालना जिल्हा 7687.39 चौ.कि.मी. क्षेत्राने व्यापलेला आहे, जे राज्याच्या एकूण क्षेत्राच्या तुलनेत 2.50 % एवढा आहे. जालना जिल्हयाचे मुख्यालय जालना असून राज्याच्या व देशाच्या राजधाणींशी ब्रॉडगेज रेल्वे लाईनने जोडलेले आहे. तसेच राज्यातील मुख्य शहरे देखील राज्य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्हा हा हायब्रीड सीडस् साठी प्रसिध्द असून स्टील रिरोलींग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दाल मील, बि.बीयाने इ. तसेच मोसंबीसाठी देखील राज्यामध्ये जालना जिल्हा प्रसिध्द आहे.
महत्त्वाची माहिती आणि सेवा
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, यांचे रिक्त पदे भरती बाबत.
- मौजे भाकरवाडी ता. बदनापूर जि. जालना येथील बाबुवाडी भाकरवाडी सिंचन तलाव साठी जमीन संपादन करणे बाबत.
- जालना जिल्ह्याह्यातील हुंंडा प्रतिबंधक अधिका-यांची माहिती सन २०२६-२०२७
- जालना -नांदेड महामार्ग निवाडे
- राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे १०वर्ष व त्यापेक्षा सेवा झालेल्या कर्मचारी याना दिनांक ३०जून२०२६ रोजीच्या शासन निर्णयनुसार अंतिम १०वर्ष व त्यापेक्षा सेवा झालेल्या कर्मचारी यांची यादी
- मा. न्यायमुर्ती श्री. संदिप शिंदे (निवृत्त) समितीने जिल्हयात अभिलेख तपासणी अंती आढळलेल्या कुणबी नोदी
- विशेष सहाय्य योजनेंतील लाभार्थ्यांकरीता BSA (Beneficiary Satyapan App) द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणे
- जिल्हा वार्षिक कृती आराखडा २०२५-२६, जिल्हा जालना.
- महाराष्ट्र शासनाच्या योजना
- स्थानिक सुट्ट्या
- जिल्हा सामाजिक व आर्थिक समीक्षा २०२५
- शासन निर्णय
- भोकरदन तहसील अन्नधान्य नियतन माहे नोव्हेंबर २०२५
- घनसावंगी तहसील अन्नधान्य नियतन माहे ऑक्टोबर २०२५
- ग्राहकांच्या तक्रारीसाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जालना यांचे पोर्टल.
- प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही
-
पोलीस हेल्पलाईन 100
-
अग्निशामक सेवा हेल्पलाईन 101
-
बाल हेल्पलाइन 1098
-
महिला हेल्पलाइन 1091
-
रुग्णवाहिका हेल्पलाईन 108
-
रेल्वे हेल्पलाईन 139
