बंद

तहसील

1 मे 1981 रोजी जालना जिल्‍हयाची निर्मीती झाली. सुरूवातीला जिल्‍हयामध्‍ये 5 तहसील होते.त्‍यात जालना, अंबड, भोकरदन, जाफ्राबाद व परतूर. जालना हे एकमेव उपविभाग होते. जालना शहर हे जिल्‍हयाचे मुख्‍यालय होते.

26 जानेवारी 1992 रोजी परतूर या उपविभागाची निर्मीती झाली.

15 ऑगष्‍ट 1992 रोजी तीन नविन तहसील कार्यालयांची निर्मीती झाली. मंठा, बदनापूर व घनसावंगी हे तीन तालुके नविन निर्माण झाले.

15 ऑगस्ट 2013 रोजी अंबड व भोकरदन या दोन नवीन उपविभागांची निर्मीती झाली.

आजच्‍या परिस्‍थीतीमध्‍ये जालना जिल्‍हयामध्‍ये 4 उपविभाग, 8 तहसील व 958 गावे आहेत.

खालील तक्‍त्‍यानुसार जिल्‍हयाची रचना व गावनिहाय माहिती दर्शविली आहे,

तहसीलचे नाव गावे सजे मंडळ
जालना 147 46 8
बदनापूर 91 30 5
भोकरदन 157 48 8
जाफ्राबाद 100 28 5
परतूर 95 28 5
मंठा 114 27 4
अंबड 137 44 7
घनसावंगी 117 41 7
एकुण 958 293 38