पत्ता :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत , तळ मजला जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
उदिष्टये :- महिला आणि बालकांसाठी असणारे कायदयाचे अंमलबजावणी व जाणीव जागृती करणे, तसेच विविध योजनाच्या माध्यमातुन गरजू महिला आणि बालकांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा विकास व्हावा ह्यासाठी संस्थात्मक आणि कायदेशीर साहाय्य करणे यांचा समावेश होतो.
कार्यालयाअंतर्गत विविध योजना-
- मिशन वासल्य
- बाल न्याय मंडळ:-सदर मंडळ हे 18 वर्षा खालील विधीसंर्घषग्रस्त बालकांसाठी कार्यरत आहे. सदर समिती मध्ये प्रधानदंडधिकारी व दोन सदस्य असतात.
- बाल कल्याण समिती:- सदर समिती हि 18 वर्षा खालील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत आहे. सदर सामिती मध्ये 1 अध्यक्ष व 4 सदस्य असतात.
- जिल्हा बाल संरक्षण कक्ष :- बालकांच्या अधिकार व संरक्षणा करीता जिल्हास्तरावर जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यरत आहे.
- SARA/CARA ( Adoption ) :- दत्तक प्रकरणामध्ये सर्व प्रकीया SARA/CARA च्या माघ्यमातुन ऑनलाईन पध्दतीने केल्या जाते.
- प्रतिपालकल्व योजना :- काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी संस्था बाहाय् सेवा म्हणुन तात्पुरत्या स्वरूपामध्ये पालकत्व मिळावे म्हणुन प्रतिपालकल्व हि योजना कार्यरत आहे.
- प्रायोजकता योजना :- हि पुर्ण पण केद्रपुरस्कुत योजना असुन या योजने अंतर्गत गरजु बालकांना दरमाह 4000/- रुपये प्रमाणे देय आहे.
- चाईल्ड हेल्प लाईन 1098:- काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी 24 X 7 कार्यरत आहे.
- बालगृह/निरीक्षणगृह
- शासकीय मुलांचे वरीष्ठ बालगृह, जालना :- सदर संस्थेत बाल कल्याण समिती जालना यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके दाखल असतात .
- शासकीय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह, जालना :- सदर संस्थेत बाल न्याय मंडव व बाल कल्याण समिती जालना यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके दाखल असतात.
- स्वंयसेवी बालगृह, जालना :- सदर संस्थेत बाल कल्याण समिती जालना यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके दाखल असतात .
- अनाथ प्रमाणपत्र :- 18 वर्षा अगोदर आई-वडील गमावलेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते.
- मिशन शक्ती
- वन स्टॉप सेंटर :- संकटग्रस्त महिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपात निवारा केंद्र कार्यरत आहे.
- महिला सक्षमीकरण केंद्र :– महिलाचे सुरक्षतेसाठी आणि त्यांच्या सामाजीक व आर्थीक सक्षमीकरणासाठी
- महिला मदत केंद्र 181 :- महिलांसाठी 24×7 कार्यरत मदत कक्ष कार्यरत आहे.
- सखी निवास :- नोकरी करण्याऱ्या महिलांसाठी सखी निवास.
- शासकीय महिला राज्यगृह :- सदर संस्था ही अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1958 अंतर्गत कार्यरत आहे.सदर संस्थेमध्ये वय 18 ते 65 या वयोगटातील महिला दाखल असतात.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना :- सदर योजने अंतर्गत एकल पालक असलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी दरमहा 2250/- प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येते.
- मुख्यंमत्री माझी – लाडकी बहीण योजना :- सदर योजने अंतर्गत 21 ते 60 या वयोगटातील वार्षीक उत्पन्न 250000/- आतील महिलांना दरमहा 1500/- प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येते.
- शुभमंगल सामुहिक विवाह योजना :- ओपन आणि ओबीसी संवर्गातील शेतकरी/शेतमजुर कुंटुंबातील मुलीच्या विवाहासाठी सामुदायीक/नोंदणीकृत विवाह योजनेतुन वधु मातेस 25000/- प्रति लाभार्थी प्रमाणे अनुदान देण्यात येते.
- बंदी/मुक्तबंदी/ परिविक्षाधीन यांचे पुनर्वसन करिता योजना :- मुक्तबंदी यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति लाभार्थी 25000/-रूपये व्यवसायाकरिता अनुदान देण्यात येते .
- समुपदेशन केंद्र :- जिल्हयात चार पोलिस स्टेशनच्या आवारात मुले आणि महिलांसाठी समुपदेशन कार्यरत आहेत.
सेवा अधिकार (RTS)
अ.क्र. | सेवेचे नाव | वेळ मर्यादा | नियुक्त अधिकारी | पहिले अपील अधिकारी | दुसरे अपील अधिकारी |
---|---|---|---|---|---|
१ | कामगार महिला वसतिगृहाच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारला स्वयंसेवी संस्थांची शिफारस | ७५ | जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी | उपायुक्त, महिला आणि बाल विकास विभाग | सह आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे |
२ | केंद्र शासनाच्या नोकरी करणाराया महिलांच्या वसतीगृहासाठी अंतर्गत अशोभनीय संस्थेच्या शिफारशी करनेबाबत | ७५ | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी | उपायुक्त , डब्ल्यूसीडी | सह आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे |
३ | महिला वसतिगृहाच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारला स्वयंसेवी संस्थांची शिफारस | ७५ | जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी | उपायुक्त, महिला आणि बाल विकास विभाग | सह आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे |
माहिती अधिकार कलम 4(1) (ख)(सोळा)
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जालना पदनिर्देशित करण्यात आलेले राज्य शासकीय सहाय्यक माहिती अधिकारी / शासकीय माहिती अधिकारी व अपीलीय प्राधिकारी यांची माहिती दर्शविणारे विवरणपत्र
अ.क्र | कार्यालय | केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधिल अधिनियम 2(2)अनुसार पदनिर्देशित केलेल्या शासकीय सहाय्यक जन माहिती अधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता व दुरध्वनी क्रमांक | केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 2(1) अनुसार पदनिर्देशित केलेल्या शासकीय जन माहिती अधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता व दुरध्वनी क्रमांक | केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 19 शासकीय अपीलीय प्राधिकारी यांचे पदनाम, पत्ता व दुरध्वनी क्रमांक |
---|---|---|---|---|
1 | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना | जिल्हा परिविक्षा अधिकारी | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी | मा.विभागीय उपआयुक्त छत्रपती संभाजीनगर महिला व बाल विकास विभाग |