विभागीय आयुक्तांच्या मतदान केंद्रांना भेटी
प्रकाशन तारीख : 17/10/2018
मतदान पुनरिक्षण कार्यक्रमातर्गंत आज दि.१९ रोजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी बदनापुर तालुक्यातील गोकुळवाडी व दुधनवाडी येथे भेट देवून मतदान केंद्राची पाहणी तसेच १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती बी एल ओ कडून घेतली.
या दौऱ्यात उपायुक्त वर्षा ठाकूर,उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगिता सानप, उपविभागीय अधिकारी केशव नेटके,बदनापुर तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार निवडणूक तुपे यांची सुद्धा उपस्थिती होती.
सुरुवातीला आयुक्तांनी गोकुळवाडी शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली व तेथील बी एल ओं ना गावात नवीन मतदार,मृत मतदार,साथलातंरित, अपंग मतदाराची माहिती विचारली तसेच गावातील लोकांचा सत्कार स्विकारतांना ते म्हणाले यावर्षी निवडणूक आयोग सुलभ निवडणुका हे ब्रीद वाक्य घेवून जनतेसमोर जात असून लोकांना अधिक सोप्या रीतीने मतदार यादीत आपली नावनोंदणी कशी करता येईल सोबतच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष मोहिम राबवून त्यांना मतदानापासून वंचित ठेवता काम नये.पात्र तरुणांनी अधिकाधिक मतदान यादीत नाव नोंदवून लोकशाही बळकटी करणासाठी मोलाचा वाटा उचलावा असे ते म्हणाले.नंतर दुधनवाडी येथील शाळेतील मतदान केंद्राला भेट देवून तेथे उपस्थित महिलांना ओळखपत्र यादीत नावाविषयी अडचणी विचारल्या व शेवटी अंपग मतदाराशी संपर्क साधला.