शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापरासंबंधी प्रशिक्षण
शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
जालना दि. 28 (जिमाका) :- आजमितीस तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असून सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वत्र केला जात आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी -कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाज करतेवेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रशिक्षणात केले.
जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी एम. के. सी. एल. मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, तहसीलदार अनिल नव्हाते, तहसीलदार प्रणाली तायडे यांची उपस्थिती होती. यावेळी एमकेसीएलचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी ए. आय. आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास महसूल अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

01 Sep
2025