महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री)
महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री)
देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्यात भारताच्या प्रगतीचे प्रतिबिंब दिसून आले आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक योगदान देणारे राज्य असणारे महाराष्ट्र राज्य, देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यातही अग्रेसर राहिले आहे. देशाला आठ टक्के विकासदर गाठायचा असेल तर महाराष्ट्राला दहा टक्के विकासदर गाठावाच लागेल.
महाराष्ट्र राज्य जगभरातील गुंतवणूकदारांचे मनापासून स्वागत करते. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. हे राज्य अनंत संधींची भूमी आहे. तुम्ही गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात यायचे निश्चित केले तर आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देतो. गुंतवणुकदार आणि व्यापारी समुदायाचे मनापासून स्वागत करायला आम्ही उत्सुक आहोत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी आम्ही तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊ. सर्वोत्तम पायाभूत सुविधा, उर्जा, कुशल मनुष्यबळ आणि इतर आवश्यक बाबी सहज उपलब्ध होतील, याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. महाराष्ट्रात अगदी प्रत्येक क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात या आणि गुंतवणूक करा.