पर्यटन स्थळे
जालना जिल्हयात महत्वाची/प्रसिध्द पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर प्रसिघ्द असुन, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास 400 वर्षापूर्वीचा चौघाडा व कल्याणस्वामींचा म्दंग तसेच वेणूबाईचा तानपूरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. मराठवाडयातील अष्टविनायकापैकी एक गणपती राजुर येथे आहे. जाम तालुका घनसांवगी येथे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदीर ही आहे. हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पही आहेत. शिवाय रऊनापराडा ता. अंबड येथे प्रसिध्द दर्गा असुन तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो
गणपती मंदीर, राजूर
गणपती मंदीर, राजूर हे जिल्हयाच्या उत्त्ारेस 25 कि.मी. अंतरावर स्थीत आहे. प्रत्येक चतुर्थीला अनेक भावीक दर्शनासाठी येतात. अंगारखी चतुर्थी निमीत्त बहुतांश भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये हजेरी लावतात.
राजूर हे गणेशाचे एक पूर्ण पिठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले गेले आहे. तसेच इतर पिठ म्हणून मोरगाव, चिंचवड (पुणे) असून राहिलेले अर्धे पिठ पदमालय हे आहे. राजूर मंदिराचे नुतनीकरणाचे काम सुरू असून सध्या ते अखेरच्या टप्यामध्ये आहे.
मत्स्योदरी देवी मंदिर, अंबड
अंबड येथील मत्स्योदरी देवीचे मंदिर हे जालना शहराच्या दक्षीणेस 21 कि.मी. अंतरावर स्थित आहे. देविचे मंदिर हे ज्या टेकडीवर स्थित आहे त्या टेकडीचा आकार मासोळी (मत्स्य) सारखा आहे. त्यामुळे या देवीस मत्स्योदरी देविचे मंदिर म्हणून ओळखले जाउ लागले. हे मंदिर जवळपासच्या क्षेत्रातील अत्यंत जुन्या मंदिरांपैकी एक आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमीत्ताने दरवर्षी या मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते
जांबसमर्थ, घनसावंगी
जांबसमर्थ येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. हे ठिकाण जालना जिल्हयातील घनसावंगी तालुक्यामध्ये आहे. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी शके 1530 (हिंदू दिनदर्शिकेनुसार) सायं. 12 झाला होता. अगदीरामजन्माचे वेळी. राम मंदिरामध्ये दर वर्षी राम नवमी निमीत्त यात्रा भरते. हे राम मंदिर रामदास स्वामी यांच्या घरामध्ये स्थीत आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्वामी यांच्या आठवणीमध्ये बनविण्यात आले आहे. एका संस्थेमार्फत या मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते. ज्याची स्थापना 1943 साली नानासाहेब देव यांनी केली. 55 सदस्य व 11 ट्रस्टी या संस्थेव्दारे करण्यात आले. आता संस्थेची स्वतःची 240 हेक्टर जमिन आहे. संस्थेमार्फत येथे राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ईमारत माता राणी होळकर, इंदोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवी अहिल्याबाई होळकर यांनी दिलेल्या देणगीमधून बनविण्यात आली आहे.
जाळीचादेव (श्री चक्रधर स्वामी), जयदेववाडी
जाळीचा देव हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्वाचे धार्मीक ठिकाण आहे. या धार्मीक ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे काही काळ वास्तव्य होते. हे ठिकाण भोकरदन तहसील कार्यालयाच्या उत्तरेकडे आहे. Shree Chakradhar Swami, Jaidevwadi
आनंदीस्वामी मंदीर, जालना
आनंदी स्वामी मंदीर हे 250 वर्षापुर्वीचे मंदीर आहे. हे मंदीर मराठा साम्राज्याचे महादजी शिंदे यांनी तयार केले होते. जुना जालना या ठिकाणी श्री संत आनंदी स्वामी यांनी समाधी घेतली होती. प्रत्येक आषाढी एकादशीनिमीत्त येथे मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात
मम्मादेवी मंदीर, जालना
हे मंदीर जुना जालना येथे मस्तगड भागामध्ये आहे. मंदीरामध्ये रोज किर्तन, भजन वधार्मीक कार्यक्रम होत असतात. विशेषतः अनेक लोक नवरात्रामध्ये दर्शनासाठी हजेरी लावतात.
संभाजीउद्यान (मोती बाग), जालना
जुना जालना मध्ये नगर पालिकेचे असलेले संभाजी उद्यान हे मोती बाग या नावाने प्रसिध्द आहे. हे उद्यान जालना शहर वासियांसाठी एक आकर्षनाचे ठिकाण आहे. उद्यानामध्ये सुंदर हिरवळीने युक्त बगीचा आहे तसेच रंगीबेरंगी फुलांची झाडे व इतर अनेक प्रकारची झाडे आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी असून झुकझुकगाडीचे मुख्य आकर्षण मुलांना उद्यानाकडे आकर्षीत करते. उद्यानाच्या मागे व उत्तरेस मोती तलावाचा सुंदर किनारा आहे. तसेच उद्यानामध्ये संगीत कारंजे असून ते देखील उद्यानाचे मुख्य आकर्षन आहे
कालीमस्जीद, जालना
जुना जालना मधील कचेरी रोड परिसरामध्ये अत्यंत जुनी असलेली मस्जीद आहे, जी काली मस्जीद म्हणून ओळखली जाते. मुस्लीम समाजामधील लोक रोज नियमीतपणे नमाज पडण्यासाठी येथे एकत्र येतात. त्याचप्रमाणे ईदच्या दिवशी देखील नमाज व धार्मीक कार्यक्रम आयोजीत केले जातात. ही मस्जीद जवळपास 400 वर्षांपुर्वीची असून ती काळया दगडांमध्ये धार्मीक गुरू जमशेद खान यांनी बांधलेली आहे.
गुरूगणेश भवन, जालना
जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश भवन हे एक महत्वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश भवन हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्टमार्फत या धार्मीक स्थळाची देखरेख व विकासाची कामे केली जातात. या ट्रस्टमार्फत शालेय संस्थान, महाविद्यालय, अंधांची शाळा, ग्रंथालय, गोशाला चालविल्या जातात. संस्थानची गोशाला ही मराठवाडयामध्ये सर्वात मोठी गोशाला आहे.
श्रीजगदंबा देवी मंदीर, मंठा
मंठा शहरापासून उत्तरेकडे दोन कि.मी. अंतरावर उंच टेकडीच्या ठिकाणी श्री जगदंबा माता मंदीर स्थीत आहे. हे मंदीर 300 वर्षांपुर्वीचे आहे. विशेषतः दर मंगळवारी भावीक दर्शनासाठी येतात. मंदीरामध्ये दर वर्षाला नवरात्र व चैत्र पोर्णीमाच्या निमीत्ताने यात्रेसाठी भाविकांची गर्दी होते
श्री बालाजी मंदिर
जुना जालना परिसरातील कचेरी रोड येथे, श्री. बालाजीचे दोनशे वर्षे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार (नुतनीकरण) सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये संस्थानचे विश्वस्त आणि सर्व भाविकांच्या मदतनिधीतून दि. १२ मार्च, २०१५ रोजी पूर्ण करण्यांत आले. या मंदिरातील पंचधातुंच्या मुर्ती मंदीर विश्वस्तांच्या पुर्वजांनी तिरुपती बालाजी येथून आणून त्यांची प्रतिष्ठापना केली. या पंचधातूंच्या श्री. बालाजी, श्री लक्ष्मी व श्री पद़मावती यांच्या असून त्या १७व्या शतकातील आहेत. याचे प्रमाणपञ भारतीय पुरातत्व विभागाने मंदिराचे विश्वस्तांना दिलेले आहे. या मंदिरामध्ये नवराञ उत्सवात याञा भरते तसेच विजयादशमीचे (दसऱयाचे ) दिवशी श्री. बालाजींची पालखी मिरवणूक राञी काढण्यांत येते. या मंदिराचा जिर्णोध्दार प्रसिध्द वास्तु शिल्पविशारद श्री. चंद्रप्रकाश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यांत आलेला आहे. हे मंदिर बांधताना ते नागरी शैलीमध्ये बांधण्यात आले आहे. एकूण १६०० चौ. फुटावर मंदिराची उभारणी करण्यांत आली असून मुख़्य गाभारा, अंतराल, सभागृह, अशी रचना आहे. मंदिराचे तीन स्वतंञ कळस आहेत, ज्यांची उंची ३५ फुटांपर्यंत जाते. मंदिरातील कोरीवकाम हे प्राचीन मंदिराच्या रचनेनुसार राजस्थानमधील कलाकारांच्या चमुने पुर्ण केले आहे. दरम्यान मंदिराचा जिर्णोध्दार पूर्ण झाला असला तरी, अद्यापही या मंदिराचे दोन सभागृह मंदिर परीसरातच उभारण्याचे काम शिल्लक आहे. या मंदिराची नोंदणी न्यास नोंदणी कार्यालयाकडेकेलेली असून याचा नोंदणी क्रमांक J-११८४ असा आहे.
मझर-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ
मौलया नुरुद्दीन यांची समाधी मझर-इ-मौलया, डोणगांव ता. अंबळ, जि. जालना येथे आहे. मौलया नुरुद्दीन यांची “वली अल-हिंद” (भारतीय प्रतिनिधी / काळजीवाहू) या पदावर “दाऊदी बोहरा दावत”, Dā’ī, येमेन केंद्रातर्फे नियुक्त करण्यात आले होते. मौलया नुरुद्दीन हे शिक्षण घेण्यासाठी, कैरो, इजिप्त गेले. ते 467 AH मध्ये भारतात परत आले आणि डेक्कन गेला. त्यांचा मृत्यू “जुमादी-अल-उला 11” मध्ये डोणगांव ता. अंबड, जि. जालना येथे मृत्यू झाला.