बंद

परतूर तालूका

परतूर तालूका

  • परतूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. परतूर हे शहरच या तालुक्याचे मुख्य ठिकाण असून ते दुधना नदीच्या काठी आहे. या शहरात शेती संशोधन केंद्र आहे. परतूर हे काचीगुडा-मनमाड लोहमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.

परतूर गावाचे प्राचीन नाव प्रल्हादपूर आहे, देशपांडे गल्लीत नृसिंह मंदिर आहे. मंदिराजवळ करक्षेत्र कुंड आहे. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर याच कुंडात नृसिंहाने आपले हात धुतले अशी आख्यायिका आहे.

  • १९३७ साली निजाम प्रांतीय मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. त्या परिषदेचे पहिले अधिवेशन १ ते ३ ऑक्टोबर १९३७ या कालावधीत हैदराबाद येथे भरले होते. या अधिवेशनानंतर मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीस चालना मिळाली.
  • जालना जिल्ह्यातील चार पैकी एक उपविभागीय कार्यालय परतूर येथे आहे.
  • परतूर तालुका हा 35°N 76.12°Eस्थित आहे. परतुरची समुद्रसपाटीपासूनची उंची ४३९ मीटर (१४४० फूट) आहे. लोअर दुधना धरण परतूरहून जवळच आहे. बागेश्वरी साखर कारखाना परतूर शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. गावकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती आहे.
  • परतूर तालूक्यातील सर्वाधिक लोक शेतकरी आहेत. प्रमुख पीक कापूस, तूर, ज्वारी, गहू, ऊस हे आहे. परतूर पासून ३४ कि.मी लोणी खुर्द गाव आहे, या गावाची परतूरच्या राजकारणावर विशेष पकड आहे. साठेनगर, शाहू नगर, सन्मित्र कॉलनी, आदर्श कॉलनी या प्रमुख कॉलनी आहेत
  • २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, परतूर शहराची लोकसंख्या ३५, ८८३ आहे. त्यात पुरुषांची संख्या १८, ४०१ तर स्त्रियांची संख्या १७,४८२ आहे. दर १००० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहेत. (संपूर्ण महाराष्ट्रात हा अनुपात ९५० आहे)
  • लोकसंख्येच्या १०.५७ टक्के अनुसूचित जातींचे, तर ३,७७ टक्के लोक अनुसूचित जमातींचे आहेत.

परतूर शहरात दर १०० माणसांमध्ये ७९.५२ माणसे साक्षर आहेत (संपूर्ण महाराष्ट्रात ८२.३४), पैकी पुरुष साक्षरता ८६.०३‍% तर स्त्री साक्षरता ७२.७२% आहे.

वाहतूक

रेल्वे

येथून मुंबई, नाशिक, पुणे,छ. संभाजीनगर , हैदराबाद, नागपूर, मनमाड, लातूर, परभणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, मुदखेड, आदिलाबाद, बासर, निजामाबाद, सिकंदराबाद आणि मनमाड या गावांना जाण्यासाठी थेट आगगाड्या आहेत.

महत्त्वाच्या गाड्या

  • मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस राज्यराणी एक्सप्रेस, मनमाड-सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस नांदेड-पुणे पुणे एक्सप्रेस या गाड्या दैनंदिन आहेत.
  • साईनगर शिर्डीतिरुपती एक्स्प्रेसविजयवाड़ासाइनगर शिर्डी एक्सप्रेसनिजामाबादलोकमान्य तिलक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेस. संभाजीनगररेणीगुंठा एक्सप्रेस, या साप्ताहिक गाड्या आहेत. नांदेडअमृतसर सचखंड एक्सप्रेस आणि चैनईमनमाड एक्सप्रेस या गाड्या परतूर स्टेशनवर थांबत नाहीत. मनमाड-सिकंदरबाद या दरम्यानच्या कोणत्याही स्टेशनापेक्षा परतूर रेल्वे स्थानकाचे महसूल संकलन अधिक आहे.
  • परतूर रेल्वे स्टेशनावर २ रेल्वेफलाट आहेत.

रोड

  • परतूरपासून राज्य परिवहन मंडळाच्या बसने पुणे, छ.संभाजीनगर , पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, सांगली, लोणार, शेगाव, खामगाव, अकोला, नांदेड, लातूर, हैदराबाद येथे थेट जाता येते. राज्य परिवहन महामंडळाचे परतूर बसस्थानक २०१० साली सर्वात फायदेशीर होते.

हवाई

  • छ.संभाजीनगरयेथील चिखलठाण्याजवळ विमानतळ अंदाजे १२० कि.मी. तर नांदेड येथे ही १४५ कि.मी. अंतरावर विमानतळ आहे

शिक्षण

  • जवाहर नवोदय विद्यालयही भारत सरकारची निवासी शाळा आहे. येथे सेंट्रल बोर्डाचा (सीबीएसईचा) अभ्यासक्रम चालतो. ही शाळा परतूरपासून तीन किलोमीटरवर आंबा येथे आहे.
  • तालुक्यातील आनंदवाडी 100% साक्षर आहे .
  • वैद्यकीय शिक्षणाचा मोठा पगडा या गावामध्ये आहे. मागील दहा वर्षांमध्ये गावातून 25 ते 30 वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर तयार झाले आहेत. फार्मासिस्ट मध्ये सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी व नोकरदार वर्ग कार्यरत आहे. परतुर व जालना या ठिकाणी सुशिक्षित गाव असल्याने अनेक सुशिक्षित कारागीर पुरवत आहे.
  • परतूरमधील शाळा मराठी व सेमी इंग्लिश माध्यम
    • जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा
    • स्वामी विवेकानंद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा
    • योगानंद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा
    • लालबहादूर शास्त्री उच्च माध्यमिक व कन्या शाळा
    • विवेकानंद प्राथमिक शाळा
    • रुक्मिणी टेकाळे उच्च माध्यमिक कन्या विद्यालय
  • इंग्रजी माध्यम
    • विवेकानंद इंग्लिश स्कूल
    • ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल
  • उर्दू माध्यम
    • अल-हद उर्दू शाळा
    • मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू प्राथमिक शाळा
    • परतूरमध्ये अलीकडच्या काळात अनेक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक खाजगी इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत
  • महाविद्यालये
    • लालबहादूर शास्त्री कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालय
    • भानुदासराव चव्हाण कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ (सीनिअर) महाविद्यालय .
    • शिवराज कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ (सीनिअर) महाविद्यालय .
    • रुक्मिणी टेकाळे कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय

धार्मीक कार्यक्रम

श्री गणेशकूंज साईनाथ मंदीर सेलू टि पाँईट परतूर येथे माघ मासातील गुरूप्रतिपदेस मोठी यात्रा भरत असुन साधारणत: ४०,००० ते ५०,००० हजार भाविक दर्शनास येतात.

मौजे दैठना खुर्द येथे श्री गंगा भारती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सात दिवसाचा सप्ताह होत असुन पंचाक्रोशीतील गावातील २००० च्या वर भाविक दर्शनास जमा होतात.

मौजे क-हाळा येथील श्री.क-हाळेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त तीन दिवसाचे धार्मीक कार्यक्रम संपन्न होऊन साधारत: दहा ते बारा हजार भाविक श्रध्देने कार्याक्रमाची शोभा वाढवतात.

मौजे लिंगसा येथे जगदंबा देवीची व  मौजे फुलवाडी येथे तुळजाभवाणी देवीची आणि मौजे रोहिणा खुर्द येथे मांडवा देवीची या ठिकाणी चैत्र मासातील चैत्रीपौर्णिमाला यात्रा भरत असुन पंचाक्रोशीतील गावातील २००० ते ३००० च्या वर भाविक दर्शनास येतात.

ग्राम महसूल अधिकारी ता.परतूर जि.जालना.

अ.क्र. मंडळ विभाग मंडळ अधिकारी यांचे नांव ग्राम महसूल अधिकारी यांचे नांव मोबाईल क्रमांक मुळ/अति तलाठी सजा सजातर्गत असलेली गावे
01. परतुर श्री.एन.एन. पठाण,

मो.9823182567

श्री.ए.एम.यादव 9403010579 मुळ परतुर परतुर
श्री.जी.आर.कुटे 9823224723 अतिरिक्‍त आंबा आंबा, मसला
श्री.के.के.वावरे 9923961500 मुळ वरफळ वरफळ, वरफळवाडी
श्री.पी.एन.राऊत 9422879793 मुळ शेवगा शेवगा, वलखेड, बामणी
श्री.आर.बी.काळे 7666577100 मुळ कावजवळा कावजवळा, डोल्‍हारा, बाबई
श्री.मंगेश लोखडे 8605927712 मुळ सिरसगांव सिरसगांव, आनंदवाडी, रायपुर
02. आष्‍टी श्री.एम.व्‍ही.भोगाने,

मो.9421653826

श्री.एन.व्‍ही.घोरपडे 7385759940 मुळ आष्‍टी आष्‍टी, ढोकमाळतांडा
श्री.पी.एन.राऊत 9422879793 अतिरिक्‍त लोणी खु. लोणी खु., आनंदगांव, कनकवाडी
श्री.अक्षय भुरेवाल 8329785930 मुळ फुलवाडी फुलवाडी, रायगव्‍हाण, पळशी
श्री.जी.एस.पेठकर 7972787385 मुळ क-हाळा क-हाळा, लिंगसा
श्री.यु.जी.तुपसमंद्रर 7588903298 मुळ सुरुमगांव न. सुरुमगांव, परतवाडी, हास्‍तुरतांडा
श्री. सय्यद युनुस 9511313712 मुळ लिखीत प्रिंपी न. लिखीत प्रिंपी, आकोली, ब्राम्‍हणवाडी
03. कोकाटे हादगांव श्रीमती. टी.एस.माळी

मो.805796178

श्री.एस.जी.अंदेलवाड 7499757604 मुळ को.हादगांव न. को.हादगांव, वाहेगांव सा., ढोणवाडी
श्री.एन.व्‍ही.घोरपडे 7385759940 अतिरिक्‍त गोळेगांव गोळेगांव, लांडकदरा, सा.गंगाकिनारा
श्री.राष्‍ट्रपाल कांबळे 7875611563 मुळ संकनपुरी संकलपुरी, चांगतपुरी, सारगांव बु.
श्री.डी.पी.धुमाळ 9923961500 मुळ पि.धामनगांव पि.धामनगांव, सा.वाहेगांव, बाणाचीवाडी, वडारवाडी.
श्रीम. व्‍ही.जी.बाळापुरे 9960819600 मुळ पांडेपोखरी पांडेपोखरी, आसनगांव, आंतरवाला
04. श्रीष्‍टी श्री.एस.आर. वरफळकर,

मो.9146990712

श्री.एस.के.मोहीते 8888001314 मुळ श्रीष्‍टी श्रीष्‍टी, श्रीष्‍टीतांडा, वाहेगांव श्रीष्‍टी
श्री.व्‍ही.एस.घुले 9922483991 मुळ खांडवी खांडवी, खांडवीवाडी
श्री.किशोर डोईफोडे 8551952741 अतिरिक्‍त पाटोदा माव पाटोदा माव, माव पाटोदा
श्रीमती निकीता बुधनर 9767089576 मुळ हातडी न. हातडी, येणोरा
श्री.शकील गारवे 9673173845 मुळ दैठणा न. दैठणा खु., दैठणा बु.
श्री.आर.बी.खुर्देळे 9765962810 मुळ सिंगोना सिंगोना, सोयंजना, शेलवडा
05. सातोना खु. श्रीमती,यु.एन. चाळणेवाड

मो.8208452132

श्री.किशोर डोईफोडे 8551952741 अतिरिक्‍त सातोना खु. सातोना खु., देवला
श्री.जी.आर.कुटे 9823224713 मुळ मापेगांव बु. मापेगांव बु., मापेगांव खु., राणीवाहेगांव, पाडळीपारधी
श्री.के.पी.जोशी 7249882843 मुळ शेलगांव शेलगांव, अंगलगांव, हनवडी
श्री.कुणाल गुंटूक 8788825559 मुळ टा.रंगोपंत टा.रंगोपंत, पिंपुळा, तोरणा, गणेशपुर
श्री.पी.डी.देशमुख 9420372890 मुळ सातोना बु. सातोना बु., उस्‍मानपुर
श्री.शुभम तालेवार 9172767258 मुळ सालगांव न. सालगांव, फिरोजाबाद, चिंचोली, रेवलगांव, होंडेगावे
06. वाटुर श्री.पी.एम.वाघ,

मो.9970175970

श्री.एस.ए.चव्‍हाण 9970310023 मुळ वाटुर वाटुर, एदलापुर, पिंपरखेडा गरड
श्री.व्‍ही.व्‍ही.जाधव 9422228435 मुळ वाढोणा वाढोणा, श्रीधरजवळा
श्री. सुनिल नरवटे 8308454209 मुळ वैजोडा वैजोडा, कोरेगांव
श्री.किशोर डोईफोडे 8551952741 मुळ बाबुलतारा बाबुलतारा, दहीफळभोगाणे, वाघाडी
श्री.भाऊसाहेब गारवे 8551952741 अतिरिक्‍त रोहीणा बु. रोहीणा खु., रोहीणा बु., नागापुर, एकरुखा
श्री.किशोर डोईफोडे 8551952741 अतिरिक्‍त नांद्रा  न. नांद्रा, ब्रहमवडगांव, कंडारी, खडकी
06 एकूण