व्यक्तीमत्वांच्या योगदानामुळे जालना जिल्हा आज औद्योगीक, वाणीज्य व सांस्कृतीक क्षेत्रामध्ये जालना जिल्हा राज्यामध्ये आघाडीवर आहे. त्यापैकी काही महत्वाची व्यक्तीमत्वे खालील प्रमाणे आहेत.
श्री समर्थ रामदास स्वामी :
श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी शके १५३० (हिंदू दिनदर्शिकेनुसार)जांब समर्थ ता. घनसावंगी येथे झाला. सुर्याजीपंत ठोसर कुळकर्णी व रेणूबाई यांचे ते थोरले चिरंजीव होते. त्यांचे मुळ नाव नारायण होते.
रामदास स्वामी यांनी ”दासबोध”, ”मनाचे श्लोक” व इतर श्लोक लिहले. त्याचबरोबर ”जय जय रघुविर समर्थ” हे बोधवाक्य दिले. तरूणांना एकत्रीत आणण्याच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये हनुमान मंदीरांची स्थापना केली.
श्री जनार्धन मामा :
श्री जनार्धन मामा हे जालना जिल्हयास लाभलेले थोर स्वातंत्रसेनानी होते. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महत्वाचे योगदान देवून आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती दिली.
त्यांचे नाव जनार्धन नागापूरकर असून त्यांना जनार्धन मामा म्हणून सर्व ओळखत होते. जालना शहराच्या मध्यभागी चौकामध्ये त्यांच्या स्मरणार्थ पुतळा बांधुन त्या चौकास त्यांचे नाव ”मामा चौक” असे नाव दिलेले आहे.
श्री बद्रीनारायण बारवाले :
श्री बद्रीनारायण बारवाले महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनीचे (महिको) हे संस्थापक होते व त्यांनी जालना जिल्हयाचे नाव जागतीक पटलावर प्रसिध्द केले. आणि ते स्वातंत्रसेनानी देखील होते. त्यांनी भारतीय शेतक-यांना चांगल्या दर्जाची बियाणे उत्पादनासाठी व वाढीसाठी महत्वाची भूमीका पार पाडलेली आहे. २००१ साली ”पद्मभूषण” हा पुरस्कार देवून भारत सरकारने त्यांना सन्मानीत केलेले आहे. तसेच १९९८ साली त्यांना वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन अमेरीका यांच्या तर्फे ”वर्ल्ड फुड प्राईज” हा बहुमान मिळाला आहे.
याव्यतीरीक्त त्यांच्या जीवनामध्ये खालील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
उत्कृष्ठ कामगीरीबद्द्ल पुरस्कार :
- 1989 विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सादर केलेल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी राष्ट्रीय पुरस्कार.
- 1990 – भारतातील बियाणे उद्योगात उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार द्वारे इंटरनॅशनल सीड्स अँड सायन्स टेक्नॉलॉजी (आयएसएटीटी).
- 1990 – वाणिज्य व उद्योग संघटनेचे फेडरेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधन प्रकल्पातील कॉर्पोरेट पुढाकार ओळखण्यासाठी
- 1996 – आंतरराष्ट्रीय बियाणे संस्था (एफआयएस) फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल बीड्स उद्योगातील भारतातील खाजगी बियाणे उद्योगाच्या विकासासाठी आणि राष्ट्री आणि आंतरराष्ट्रीय बियाणे व्यापार संस्थांना त्यांच्या समर्पित सेवेसाठी महत्त्वाच्या भूमिकेसाठी मानद आजीवन सदस्य.
- 1998 – वर्ल्ड फूड प्राईज फाऊंडेशन, यु.एस. यांनी आर. बरवाले यांना जागतिक अन्न पुरवठा वाढविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट यशाबद्दल जागतिक अन्नधान्य पुरस्कारासाठी देण्यात आले.
- 2001 – भारत सरकारच्या 26 जानेवारी 2001 रोजी प्रजासत्ताक दिनी निमित्त दिवाळी निमित्त पादामभूषण भारतातील हा पुरस्कार व्यापार आणि आर्थिक कार्यक्षेत्रातील आपल्या उच्च प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठित सेवांची ओळख आहे.