औद्योगीक माहिती
जालना जिल्हाची औद्योगिक पार्श्वभुमी चांगली असुन मुख्यता बी-बियाणे व लोह उद्योगामध्ये जिल्हयाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे. जिल्ह्याचा औद्योगिक विकास हा अभियंत्रिक, प्लास्टिक व कृषी उद्योगावर अवलंबुन आहे.
दालमिल, तेल गिरणी व शुधिकरण, लोह पुनरुतपदान, प्लास्टिक, टाइल्स आणि सिमेंट पाइप, खत उद्योग, किटनाषके आणि सहकारी साखर कारखाण हे सुद्धा औद्योगिक विकासात महत्वाचे योगदन करतात.
येथे कापसाच्या सुत गिरण्या आणि प्रेसींग कंपण्या आहेत, त्याच बरोबर बाजार समित्या मार्फत मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन केले जाते, जसे कापुस. औद्योगिक विकासासाठी राज्य सरकारने छोठ्या व मोठ्या उद्योगाना प्रोत्साहीत कारण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. या आराखडा अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ने औद्योगिक वसाहत निर्माण केली असुन तेथे लघु,मध्यम आणि मोठे उद्योग आहे. येथे सर्वातजासत लोह व बी-बियाणे उत्पादन कंपण्या, जसे महिको,महिंद्रा, बैजु-शितल कंपण्या असुन बॉल बेरींग, कृषी संबंधीत, जसे दालमिल कंपण्यासुधा आहेत. एमआयडीसी नेे जाहिर केले आहे, कि येथे खाजगी क्षेत्राच्या मदतीने जैव प्रद्योगिक क्षेत्र विकसित करणार आहे. त्यामुळे क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल.
महिको, महिंद्रा, बेजो-शितल ह्या कंपण्या अग्रक्रमित कंपण्या पैकी काही आहे.
एनआरबी बेअरींग लिमीटेड ही एक अग्रगण्य कंपनी असुन ते ओटोमोबाइल व अवजड उद्योगाना पुरवठा करते.
जालना जिल्ह्यामध्ये खालील सहकारी साखार कारखाने आहे,
- जालना सह्कारी साखर करखाना, रामनगर, जालना.
- समर्थ सह्कारी साखर करखाना, समर्थनगर, अंबड.
- बागेश्वरी सह्कारी साखर करखाना, परतुर.
- रामेश्वरी सह्कारी साखर करखाना, भोकरदन.
- सागर साखर कारखाना.
- समृद्धी साखर कारखाना, देवी दहेगाव, ता. घनसावंगी.