बंद

प्रशासकीय रचना

श्री रविन्द्र बिनवडे हे जालना जिल्‍हयाचे जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी आहेत.

1 मे 1981 रोजी जालना जिल्‍हयाची निर्मीती झाली. सुरूवातीला जिल्‍हयामध्‍ये 5 तहसील होते.त्‍यात जालना, अंबड, भोकरदन, जाफ्राबाद व परतूर. व जालना हे एकमेव उपविभाग होते. जालना शहर हे जिल्‍हयाचे मुख्‍यालय होते.

26 जानेवारी 1992 रोजी परतूर या उपविभागाची निर्मीती झाली.

15 ऑगष्‍ट 1992 रोजी तीन नविन तहसील कार्यालयांची निर्मीती झाली असुन मंठा, बदनापूर व घनसावंगी हे तीन तालुके होय.

15 ऑगस्ट २०१३ रोजी अंबड व भोकरदन या दोन नवीन उपविभागांची निर्मीती झाली.

आजच्‍या परिस्‍थीतीमध्‍ये जालना जिल्‍हयामध्‍ये 4 उपविभाग, 8 तहसील व 958 गावे आहेत.