जांबसमर्थ, घनसावंगी

दिशा

जांबसमर्थ येथे संत रामदास स्‍वामी यांचा जन्‍म झाला. हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे. समर्थ रामदास स्‍वामी यांचा जन्‍म चैत्र शुक्‍ल नवमी शके 1530 (हिंदू दिनदर्शिकेनुसार) सायं. 12 झाला होता. अगदीरामजन्‍माचे वेळी. राम मंदिरामध्‍ये दर वर्षी राम नवमी निमीत्‍त यात्रा भरते. हे राम मंदिर रामदास स्‍वामी यांच्‍या घरामध्‍ये स्‍थीत आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्‍वामी यांच्‍या आठवणीमध्‍ये बनविण्‍यात आले आहे. एका संस्‍थेमार्फत या मंदिराचे व्‍यवस्‍थापन पाहिले जाते. ज्‍याची स्‍थापना 1943 साली नानासाहेब देव यांनी केली. 55 सदस्‍य व 11 ट्रस्‍टी या संस्‍थेव्‍दारे करण्‍यात आले. आता संस्‍थेची स्‍वतःची 240 हेक्‍टर जमिन आहे. संस्‍थेमार्फत येथे राहण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. ही ईमारत माता राणी होळकर, इंदोर यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ देवी अहिल्‍याबाई होळकर यांनी दिलेल्‍या देणगीमधून बनविण्‍यात आली आहे.

छायाचित्र दालन

  • जाम्ब समर्थ मंदिर
    JambSamarthTemple
  • Ram Das
    Ramdas
  • JamSamarth
    जांब समर्थ

कसे पोहोचाल?:

विमानाने

जालना शहरामध्ये हवाई सुविधा नाही. सर्वात जवळचे विमानतळ चिकलथाना औरंगाबाद आहे. जालना पासुन 64 किमी दूर चिकलथाना विमानतळ (आयएक्सयू), औरंगाबाद आहे. जालना पासुन घनसावंगी साठी नियमीत बस ची व्यवस्था आहे.

रेल्वेने

जवळील रेल्वे स्थानक: परतुर देशातील इतर प्रमुख शहरांमधून परतुर येण्या जाण्यासाठी नियमित गाड्या सहजपणे मिळू शकता. परतुर पासुन जाम समर्थ साठी नियमीत बस ची व्यवस्था आहे.

रस्त्याने

बस स्थानक: जालना, घनसावंगी, परतुर देशातील इतर प्रमुख शहरांपासून जालनापर्यंत नियमित बस आहेत. जालना पासुन जांबसमर्थ साठी नियमीत बस ची व्यवस्था आहे.