राष्‍ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, जालना

 • टपाल माहिती प्रणाली :

जिल्‍हाधिकारी कार्यालयामधील सर्व शाखांमध्‍ये आवक जावक पत्रव्‍यवहार बाबत देखरेख ठेवण्‍यासाठी क्‍लायंट सर्व्‍हरबेस्‍ड सुचना सुचना प्रणाली विकसीत करण्‍यात आली आहे. आवक जावक विभागात टपाल आल्‍यानंतर त्‍यांची छाननी करून संबंधीत शाखेस वर्ग करण्‍याचे काम टपालाची सध्‍यस्‍थीती , प्रलंबीत प्रकरणे इ. ची माहिती सर्व विभाग प्रमुख संगणकामार्फत घेवू शकतात.

 • अभिलेख कक्ष प्रणाली

अभिलेख कक्षात ठेवण्‍यात आलेले विविध अभिलेखांची संचिका क्रमांक, बस्‍ता क्रमांक, रॅक क्रमांक, वर्षइ. नुसार संगणकाच्‍या मदतीने वर्गीकरण केले जाते. कोणतीही संचिका प्रकरण क्रमांक, विषय, दिनांक यापैकी एकाव्‍दारे सहजपणे कमी वेळेमध्‍ये अचुकपणे सदर संगणक प्रणालीमधुन शोधता येते

 • भूसंपादन प्रकरणांबाबत प्रणाली

जिल्‍हयातील विवीध भूसंपादन प्रकरणांची देखरेख करण्‍यासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. विविध भूसंपादन प्रकरणांबाबत‍ची माहिती संगणकावर कमी वेळेत अचुकपणे शोधता येते.

 • मा. जिल्‍हाधिकारी संदर्भ प्रणाली (REFNIC)

सदर संगणक प्रणाली मा. जिल्‍हाधिकारी यांनी संबंधीत विभागास अग्रेषीत केलेल्‍या विविध संदर्भांची नोंद करून त्‍याबाबत संबंधीतांनी वेळेत केलेली कार्यवाही, प्राधान्‍यक्रम, इ. बाबत माहिती उपलब्‍ध होते. वेळेत कार्यवाही न झाल्‍यास संबंधीत अधिका-यास, सदर प्रणालीतून आपोआप मुदत संपल्‍यानंतर सुचना, मेमो, स्‍मरणपत्र इ. तयार होतात.

 • भूमी अभिलेख सुचना प्रणाली

भूमी अभिलेख सुचना प्रणाली ही जिल्‍हयात यशस्‍वीपणे कार्यान्‍वीत करण्‍यात आलेली आहे. जवळपास ३.५ लक्ष संगणकीकृत ७/१२ जिल्‍हयात वाटप करण्‍यात आलेले आहेत. तालुक्‍यांचे मास्‍टर कोडचे प्रमाणीकरण व डेटा एकत्रीकरण जिल्‍हा डेटा सेंटरमध्‍ये करण्‍यात येते.

 • मालमत्‍तापत्रक सुचना प्रणाली.

निवासी जमिनीसाठी संगणकीकृत मालमत्‍ता पत्रक सुचना प्रणाली जिल्‍हयात कार्यान्‍वीत आहे. सदर प्रणालीतून अद्ययावत संगणकीकृत मालमत्‍तापत्रक, फेरफार नोंदींची माहिती संकलीत करण्‍यात येते. सदर माहिती जिल्‍हयाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली आहे.

 • संचिका देखरेख प्रणाली (FMS):

    संचिकांची देखरेख, निपटारा याबाबतच्‍या कामकाजासाठी ही संगणक प्रणाली तयार करण्‍यात आली आहे.

 • लॅन

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या इमारतीमधील सर्व शाखांमधील संगणकांची लॅनच्‍या माध्‍यमातून एकमेकांना जोडणी  करण्‍यात आलेली आहे. यामार्फत सर्व संगणकांना ३४/१०० MBPS लीज लाईनच्‍या माध्‍यमातून इंटरनेट सुविधा पुरविण्‍यात आली आहे. सदर लॅनचा उपयोग ई-ऑफीस करीता मोठया प्रमाणात होणार आहे.

 • रेडीओ फ्रीक्‍वेन्‍सी  नेटवर्क ( RF Network)

या प्रणालीच्‍या माध्‍यमातून पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्‍हा परिषद, जिल्‍हा व सत्र न्‍यायालय, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग वायरलेस नेटवर्कच्‍या माध्‍यमातून जोडलेले आहेत.

 • व्हिडीओ कॉन्‍फरंस

लिज लाईनच्‍या सहायाने सदर यंत्रणा जिल्‍हयामध्‍ये कार्यान्‍वीत करण्‍यात आली आहे. सदर यंत्रणेच्‍या सहायाने मंत्रालयीन, विभागीय, जिल्‍हा, तालुका स्‍तरावर वरीष्‍ठ व कनिष्‍ठ अधिका-यांशी थेट संपर्क करून कार्यालयीन कामकाजांबाबत आढावा घेता येतो. यामुळे वेळेची व पैशांची बचत होते.

 • लिज लाईन

जिल्‍हाधिकारी कार्यालयामध्‍ये नियंत्रण कक्ष, व्हिडीओ कॉन्‍फरंस कक्ष व इतर कार्यालयीन कर्मचा-यांना लिज लाईन जोडणीमार्फत इंटरनेट सुविधा प्रदान करण्‍यात आली आहे.

 • जिल्‍हयाचे संकेतस्‍थळ (http://jalna.nic.in)

राष्‍ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, जालना यांनी जालना जिल्‍हयाचे संकेतस्‍थळ विकसीत करून प्रदर्शीत केले आहे. जिल्‍हयातील प्रशासकीय स्‍वरूपाची विवीध माहिती प्रसिध्‍द करण्‍यासाठी या संकेतस्‍थळाचा उपयोग केला जातो. या संकेतस्‍थळामुळे सर्वसामान्‍यांना आवश्‍यक माहिती कमी वेळेत कोठेही उपलब्‍ध होवू शकते.

 

इतर कार्यालयांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्‍या सेवा.

१)        जिल्‍हा व सत्र न्‍यायालय-

ऑनलाईन केस सध्‍यस्‍थीतीची माहिती, पगारपत्रक, इ-मेल व इंटरनेट सुविधा, ई.कोड प्रणालीसाठी सहाय इ.

२)        जिल्‍हा परिषद-

पंचायत राज संकेतस्‍थळासाठी माहिती जमा करणे व भरणे DRDA च्‍या विवीध योजना व कार्यक्रमांना तांत्रीक सहाय.

३)        रोजगार व स्‍वयंरोजगार कार्यालय-

बेरोजगार युवकांचे ऑनलाईन रजिष्‍ट्रेशन व संगणकीकृत नोंदणी कार्ड वाटप सुविधा, टचस्‍क्रीन सेवा इ.

४)        जिल्‍हा कोषागार कार्यालय –

तांत्रीक व संगणक सहाय, सर्व डि.डी.ओंना BDS बाबत प्रशिक्षण देणे.

५)        कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती (APMC)

AGMARKNET संगणक प्रणालीसाठी तांत्रीक सहाय दैनिक बाजारभाव संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍याची योजना, टचस्‍क्रीन, कियॉस्‍क सुविधा.

                ६)  पोलीस प्रशिक्षण केंद्र ( CIPA)

संगणक प्रणालीची अंमलबजावणी व तांत्रीक सहाय.

                ७)  IDSP – NIC SI तर्फे IDSP प्रणाली साठी संगणक डेटा मॅनेजर, संगणक ऑपरेटर पुरविण्‍यात आलेले आहेत.

                CONFONET (जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच)

                       जिल्‍हा ग्राहक मंच साठी CONFONET संगणक प्रणालीसाठी तांत्रीक सेवा पुरविण्‍यात येतात.

 

पुढील माहितीसाठी संपर्क –

               श्री रविकुमार पु. पडुळकर

               जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी कार्यालय , जालना

               फोन – ०२४८२-२२५७५४ ई-मेल- mahjal@nic.in

 

 
राज्‍य सुचना विज्ञान अधिकारी, श्री मोईज हुसैन अली   परतूर तहसील येथील कार्यक्रमात बोलताना

District Collector  Distributing Laptops to Village officers(Talathi), Talthis with LAPTOPS

Honorable Judges from District Court in the Training Session at NIC, Jalna

RDD Secretary Sh Sudhir Thakre & Collector  Sh Tukaram Mundhe distributing 7/12 at Gram Seva Kendra

NIC Jalna Stall in 14th National Egovernance Conference Aurangabad

Hon. Chief Minister Sh. Pruthwiraj Chavan Inaugarating e Office at Collectorate Jalna

  Hon. Collector Sh. A S R Naik Inaugurating Direct Benefit Transfer  Jalna