रोजगार व स्वयंरोजगार विभाग

 

विभागाचे नांव                                     : रोजगार व स्वयंरोजगार विभाग

कार्यालयाचा पत्ता                                 : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र

    प्रशासकीय इमारत 2 माळा अंबड रोड जालना

कार्यालयाचा फोन नंबर                          : (02482)225504

ईमेल-आयडी                                        : asstdiremp.jalna@ese.maharashtra.gov.in  ,   jalnarojgar@gmail.com

 

विभाग प्रमुखाचे नांव व पदानाम             : श्री एन एन सूर्यवंशी, सहायक संचालक

मंजूर पदाची संख्या                                : मंजूर पदे 11 भरलेलीपदे 04 रिक्त्पदे 07

(भरलेली व रिक्त्‍पदे)

विभाग योजना (केंद्रशासन                       राज्यशासन

राज्यशासन स्थानिक इतर)

आमच्याबाबत / आमचा दृष्टीकोन

युवकांना नोकरीकरिता सहाय्य आणि स्‍वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे.

आमचा उद्देश

उमेदवारांना आश्वासित, पारदर्शक व विकेंद्रित रोजगार, स्‍वयंरोजगारांची सेवा ई-प्रशासनाच्‍या माध्यमातून मिळवून देणे, उमेदवारांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढविणे, उद्योजकांना रोजगार व स्‍वयंरोजगार विभागांतर्गत उमेदवार घेण्यासाठी उद्युक्त करणे व त्याव्दारे युवकांचा सामाजिकस्तर वाढविणे.

आमचे कार्य

 • बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मदत करणे.
 • एसएमएस व्दारे उमेदवारांना नोकरी, व्यवसायाबाबत सूचित करणे.
 • उद्योजकांची नोंदणी करणे आणि त्‍यांना त्‍यांचे मागणीनुसार पात्र रोजगारईच्‍छूक उमेदवार पुरविणे.
 • सेवायोजन क्षेत्र माहिती
 • स्‍वयंरोजगार - व्यावसायिक माहिती.
 • व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन
 • रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम
 • कौशल्य विकास कार्यक्रम
 • रोजगार मेळावे
 • आदिवासी युवकांसाठी प्रशिक्षण
 • सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे.) कायदा १९५९ ची अंमलबजावणी
 • सेवा सोसायटी
 • असंघटीत क्षेत्रातील सेवा देणा-या व सेवा घेणा-यासाठी पाठबळ व मदत देणे.
 • अंपग उमेदवारांसाठी विशेष रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रे
 • करियर लायब्ररी

1) रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम (रो.प्रो.का.):-

रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम या योजनेमध्‍ये सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना त्‍यांचे कौशल्‍य व क्षमता वाढविण्‍यासाठी खाजगी आस्‍थापनांमध्‍ये प्रत्‍यक्ष कामाव्दारे प्रशिक्षण देण्‍यात येते. रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम या योजनेचा मूळ उद्देश उमेदवारांचे कौशल्‍य वाढवून त्‍यांना मागणीनुसार नोकरीक्षम करणे हा होय.रोजगार प्रोत्‍साहन कार्यक्रम हया योजनेमध्‍ये विदयावेतन देण्‍यात येते.या योजनेमध्‍ये उद्योजक व नोकरीउत्‍सुक उमेदवार यांना एका छताखाली एकत्र आणून उद्योजकांना आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ विनामूल्‍य उपलब्‍ध करुन देणे व नोकरीउत्‍सुक उमेदवारांना नोकरीसाठी सहाय्य करण्‍याकरिता रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत विशेष प्रयत्‍न केले जातात.

2) रोजगार मेळावे:-

या योजनेमध्‍ये उद्योजक व नोकरीउत्‍सुक उमेदवार यांना एका छताखाली एकत्र आणून उद्योजकांना आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ विनामूल्‍य उपलब्‍ध करुन देणे व नोकरीउत्‍सुक उमेदवारांना नोकरीसाठी सहाय्य करण्‍याकरिता रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत विशेष प्रयत्‍न केले जातात.

रोजगार मेळाव्‍यामध्‍ये सहभागी होण्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नोंद करणे आवश्‍यक आहे.

अ) नो‍करीउत्‍सुक उमेदवारांकरिता सुविधा:-

o रोजगार मेळाव्‍याचे ठिकाण व वेळापत्रक ऑनलाईन पाहण्‍याची सुविधा.

o    रोजगार मेळाव्‍यामध्‍ये उपलब्‍ध रिक्‍तपदांची माहिती ऑनलाईन पाहण्‍याची सुविधा.

o    रोजगार मेळाव्‍यामध्‍ये सहभागी होण्‍याकरिता ऑनलाईन नोंद करण्‍याची सुविधा.

o    रोजगार मेळाव्‍यासंबंधीची माहिती SMS Alert व E-mail व्दारे मिळण्‍याची सुविधा

 

ब) उद्योजकांकरिता सुविधा:-

o    रोजगार मेळाव्‍यासाठीची रिक्‍तपदे ऑनलाईन नोंदविण्‍याची सुविधा.

o    रोजगार मेळाव्‍याचे ठिकाण व वेळापत्रक ऑनलाईन पाहण्‍याची सुविधा.

o    रोजगार मेळाव्‍यासंबंधीची माहिती SMS Alert व E-mail व्दारे मिळण्‍याची सुविधा.

o    रोजगार मेळाव्‍यासंबंधीची सांख्यिकी माहिती ऑनलाईन सादर करण्‍याची सुविधा.

क) सेवा सोसायटी:-

नोकरीउत्सुक उमेदवारांच्या सहकारी सेवा संस्था स्थापन करुन,त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे आणि शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रांकडील कामे त्यांना मिळवून देऊन, वाढती बेरोजगारी कमी करण्याचा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहॆ. सहकारी संस्था कायदा, 1959 अंतर्गत सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नांवनोंदणी केलेल्यां किमान 11 नोकरीउत्सुसक उमेदवारांची आवश्यकता असते.

उपलब्‍ध सुविधा

 • स्‍थापन झालेल्या. सेवासोसायट्यांची रोजगार व स्व.यंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंद करणे व माहितीमध्येत बदल करणेकरिता ऑनलाईन सुविधा.
 • राज्‍य शासन / स्‍थानिक स्वगराज्यस संस्थार यांच्यानकडील सेवा सोसायट्यांकरिता वाटपासाठी उपलब्ध असलेली कामे (रु. 5 लाखा आतील, विना निविदा) शोधण्‍याची व ती मिळविण्याककरिता अर्ज सादर करण्या ची ऑनलाईन सुविधा.
 • व्‍यवस्‍थापकीय अनुदानाकरिताचे प्रस्तावव ऑनलाईन सादर करण्याची सुविधा.
 • सेवा सोसायट्या पुरवित असलेल्या सेवांची जाहिरात करण्याची सुविधा.
 • सेवा सोसायट्या पुरवित असलेल्या सेवांचा त्यांच्या कामाचे ठिकाण, कामांचा प्रकार / कौशल्‍य, यावर आधारित शोध घेण्याची ऑनलाईन सुविधा.
 •  

ड) कौशल्य विकास:-

प्रतिदिन वाढत असलेल्‍या मनुष्यबळास कौशल्याधारित प्रशिक्षण देउन त्यांच्‍या सर्वांगीण कौशल्‍यामध्ये    वाढ करणे, हा या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

-:उमेदवारासाठी उपलव्ध सेवा:-

 • मुल्यमापन व समुपदेशन केंद्रांचा शोध घेणे व त्यांची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा
 • मुल्यमापन व समुपदेशनाबाबतचे वेळापत्रक व तदनुषंगिक माहिती शोधण्‍याची व पाहण्‍याची ऑनलाईन सुविधा.
 • कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थांचा शोध घेणे व त्यांची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा
 • मुल्यमापन, समुपदेशन आणि प्रशिक्षण याबाबतचा अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा.
 • मुल्यमापन, समुपदेशन आणि प्रशिक्षणाचे निकाल ऑनलाईन पाहण्याची सुविधा.

   -: मुल्यमापन, समुपदेशन आणि प्रशिक्षण संस्था यांच्‍याकरिता उपलब्ध सेवा:-

 • कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मुल्यमापन संस्था, समुपदेशन संस्था व प्रशिक्षण संस्था यांची ऑनलाईन नोंदणी करणे व अनुषंगिक माहिती अपलोड करण्‍याची सुविधा.
 • कौशल्य कमतरता अहवाल आणि जिल्‍हानिहाय कौशल्‍य विकास नियोजन आराखडा ऑनलाईन पाहण्‍याची सुविधा

इ) ग्रंथालय

            जिल्हा कार्यालयामध्ये विविध स्पर्धा परिक्षचे पुस्तके असून ज्या उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली आहे त्यानी नोंदणी कार्ड दाखवून सदरील पूस्तकाचा लाभ घेवू शकतात. कार्यालयात एकूण 472 पूस्तके उपलब्ध आहेत.

ई) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई

       खूल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्टया मागसलेल्या 18 ते 45 वयोगटातील नांव नोंदणीकेलेल्या उमेदवारांसाठी बीज भांडवल कर्ज योजना (शासन निर्णय) जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्जदारास रु. ५ लाखांपर्यंत प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायांकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या मध्ये राष्ट्रीयकृत / अधिसूचित बँकेचा सहभाग ६०% असून अर्जदारास ५% रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रक्कमेच्या ३५% रक्कम महामंडळा मार्फत बीजभांडवल म्हणून देण्यात येते.महामंडळाच्या मंजूर रक्कमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येते. परत फेडीचा कमाल कालावधी ५ वर्षाचा असून त्यासाठी वसुली ही मासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक प्रमाणे करण्यात येते.

आर्थिक व भौतिक खर्च (राज्यशासन केद्रशासन स्थानिक इतर)

साध्य                            :-

नाविन्यपूर्ण योजना           :-

1) योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कायदे, शासन निर्णय,मार्गदर्शक तत्वे:- सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिचूचित करणे) कायदा 1959 नियम 1960 :-

सदरील कायदा केंद्रशासनचा असून शासकीय तथा खाजगी आस्थापनाना 25 पेक्षा जास्त्‍

मनुष्यबळ असणा-या आस्थापनाना लागू आहे. आस्थापनाना सक्तीने रिक्तपदे अधिसूचित करणे भाग पाडणे तसेच ER-I & ER-II भरणे बंधनकारक आहे. रिक्तपदे सेवायोजन कार्यालयास कळविणे कायदयान्वये बंधनकारक असून सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियामध्ये सामावून घेणे आवश्यक आहे.

 

आरटीआय प्रकटन            :-

विभागाची वेबसाईट        :- https://www.maharojgar.gov.in