जिल्‍हयाबाबत भौगोलिक माहिती

स्‍थान व सिमा

जालना जिल्‍हा हा महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी असून मराठवाडा विभागाच्‍या उत्‍तरेस स्थित आहे.

जालना जिल्‍हयाचे भौगोलीक स्‍थान हे हा 1901 उत्‍तर ते 2103 उत्‍तर अक्षांस आणि 7504 पुर्व

ते 7604 पुर्व रेखांश असे आहे. जिल्‍हयाने 7612 स्‍क्‍वे. कि.मी. एवढे क्षेत्र व्‍यापले आहे. जे राज्‍याच्‍या

एकूण क्षेत्रफळाच्‍या 2.47 % एवढे आहे. जिल्‍हयाची सिमा ही उत्‍तरेकडे जळगाव, पुर्वेकडे परभणी

व बुलढाणा, दक्षीणेकडे बीड व पश्‍चीमेकडे औरंगाबाद जिल्‍हयास जोडलेल्‍या आहेत.

(Maps are not to scale)
Maharashtra State Map
Geographical Location Map
Jalna District & Tahsils

जिल्‍हयाची जनगणना 2011

जालना जिल्हा 2011 जनगणेनूसार लोकसंख्या

 

अ.क्र. तालुका नागरी / ग्रामीण गावे/ न,प, एकूण कुटूंब लोकसंख्या 2011 नूसार साक्षरता 2011 नूसार
एकूण पुरुष स्त्रीयां एकूण पुरुष स्त्रीयां
1 भोकरदन ग्रामीण 157 58496 286680 148984 137696 175599 107400 68199
नागरी C 4544 24432 12734 11698 17255 9720 7535
एकूण 157 63040 311112 161718 149394 192854 117120 75734
2 जाफ्राबाद ग्रामीण 100 34404 163174 84966 78208 105133 63409 41724
नागरी 0 0 0 0 0 0 0 0
एकूण 100 34404 163174 84966 78208 105133 63409 41724
3 जालना ग्रामीण 147 46664 233524 121295 112229 141143 86323 54820
नागरी A 53730 285349 147714 137635 209531 116300 93231
एकूण 147 100394 518873 269009 249864 350674 202623 148051
4 बदनापूर ग्रामीण 91 30445 154025 80076 73949 95189 58251 36938
नागरी 0 0 0 0 0 0 0 0
एकूण 91 30445 154025 80076 73949 95189 58251 36938
5 अंबड ग्रामीण 137 45009 224269 116006 108263 134321 81300 53021
नागरी C 6174 31531 16232 15299 22134 12358 9776
एकूण 137 51183 255800 132238 123562 156455 93658 62797
6 घनसांवगी ग्रामीण 117 42903 210847 108682 102165 122480 73460 49020
नागरी 0 0 0 0 0 0 0 0
एकूण 117 42903 210847 108682 102165 122480 73460 49020
7 परतूर ग्रामीण 95 28615 141710 73262 68448 83740 50650 33090
नागरी C 6345 35920 18502 17418 25348 14140 11208
एकूण 95 34960 177630 91764 85866 109088 64790 44298
8 मंठा ग्रामीण 114 34372 167022 86663 80359 102560 62091 40469
नागरी 0 0 0 0 0 0 0 0
एकूण 114 34372 167022 86663 80359 102560 62091 40469
  एकूण ग्रामीण 958 320908 1581251 819934 761317 960165 582884 377281
नागरी 0 70793 377232 195182 182050 274268 152518 121750
एकूण 958 391701 1958483 1015116 943367 1234433 735402 499031
 

वातावरण

जिल्‍हयाचे वातावरण हे उप उष्‍णकटीबंधीय स्‍वरूपाचे आहे. जिल्‍हयाच्‍या दक्षीण-पश्‍चीम भागामध्‍ये पावसाचे प्रमाण जास्‍त आहे.

  जिल्‍हयाचा सरासरी पाऊस हा 650 ते 750 मि.मी. एवढा आहे. 400 ते 450 मि.मी. पाऊस कमीत कमी पडतो.

हिवाळयाच्‍या नंतर पावसाळयाची सुरवात होते. पावसाळयात सरासरी किमान तापमान 9 ते 10 अंश से. व सरासरी कमाल तापमान 30 ते 31 अंश से. असते.

हिवाळा संपल्‍यानंतर उन्‍हाळयाची सुरूवात होते. सरासरी 4 महिन्‍यांचा कालावधी उन्‍हाळा असतो.

दिवसाचे कमाल तापमान हे सरासरी 42 ते 44 अंश से. एवढे असते.

हवामान व पर्जन्यमान -

जिल्हयाचे हवामान समशितोष्ण आहे.  हवामानाच्या दृष्टीने  जिल्हयाचे हवामान तीन विभागात मोडते.

अ) जुन ते सप्टेबर हे चार महिने पावसाचे असुन हवामान साधारणपणे उष्ण असते साधारणपणे तापमान 11.0 अंश किमान  ते 39.50 कमाल अंशाच्या दरम्यान असते.

ब) आक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत थंडी जाणवते. या काळात थंड व कोरडे वारे वाहतात व रात्री हवेत गारठा आढळतो.

क) मार्च ते मे या तीन महिन्यात हवा उष्ण व कोरडी असते. एप्रिल व मे महिन्यात कमालीची उष्णता असते. जालना जिल्हयात तापमान नोंद केंद्र नाही. नजीकचे तापमान केंद्र चिकलठाणा आहे.

जिल्हयात पावसाचे प्रमाण बेताचे आढळते. या जिल्हयात नियमीत व पुरेसा पाऊस पडत नाही. जिल्हयात सरासरी 643 ते 825 मी.मी. पाऊस पडतो. जिल्हयात सर्व भागात सारख्या प्रमाणात पाऊस पडत नाही. वेळोवेळी का ही भागात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होतांना आढळते. बदनापुर, अंबड, घनसावंगी तहसीलचा काही भाग व मंठा तहसील विश्वसनीय पावसाचे भाग समजले जातात. मात्र अंबड तहसीलच्या काही भागाचा समावेश अवर्षणप्रवणक्षेत्रात मोडतो. जिल्हयातील बहुतांश पाऊस नैऋ्त्य मोसमी वा-यापासून पडतो. आक्टोबर महिन्यात ईशान्य मोसमी वा-यापासुन तुरळक पाऊस पडतो.

 

तहसील

Annual Avg.

2012

2013 2014

जालना

700.9

348.4

823.7

438.5

बदनापूर

700.1

345.4

617.4

316.6

भोकरदन

662.9

292.5

785.1

490.4

जाफ्राबाद

640 .4

324.2

959.4

360.0

परतूर

743.9

429.9

968.2

476.0

मंठा

707.4

314.2

860.2

317.2

अंबड

651.7

315.6

757.3

363.3

घनसावंगी

699.2

229.6

538.6

269.7

एकूण

688.3

324.98 788.6 377.4
 

आकृती विज्ञान

  जिल्हयातील बहुतांश जमिन अग्निजन्य काळया दगडापासून तयार झालेली असून ती काळी मध्यम काळी, चुनखडीयुक्त व कमी जास्त खोलीची व निरनिराळया पोताची आहे.  जिल्हयातील भोकरदन, जाफ्राबाद, जालना व बदनापुर मधील जमीन हलकी ते मध्यम प्रतीची आढळते. अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा तहसिल मधील गोदावरी नदीलगतची जमीन भारी, काळी व सुपीक आहे. ही काळी जमीन कापुस उत्पादनासाठी अतिशय पोषक आहे. ही जमीन ज्वालामुखीपासुन तयार झाली असून, त्यात वनस्पतीस पोषक अन्नपदार्थ भरपुर प्रमाणात आढळतात. रेगुर नावाची रेताड जमीन ज्वालामुखीपासून अनेक स्थित्यंतरानंतर तयार झाली आहे. स्थान व खोलीनुसार जमीनीच्या प्रतीत बदल आढळतो  स्थितिनुसार जमीनीचे हलके मध्यम व भारी असे वर्गीकरण केले जाऊ शकते. नदीच्या किना-यालगतची जमीन खोल,काळी व सुपीक आढळते भुशास्त्राप्रमाणे जमीनीचे वर्गीकरण पुढे दर्शविल्याप्रमाणे होऊ शकते.

अ)  दख्खन भुप्रदेशातील मध्यम भाग,

ब)  गोदावरी नदीच्या गाळाचा सुपीक भाग,

क)  गोदावरी व इतर नदयाच्या गाळामुळे तयार झालेला स्तर.

Jalna District Physiography
 

भूजल उपलब्‍धता

जिल्‍हयाची भौगोलीक रचना ही साधारनता बेसॉल्‍टी पठाराची आहे. उत्‍तरेकडील भाग हा बेसॉल्‍टीक पठाराचा असून जास्‍त घनतेचे आहे. त्‍यामुळे भूजल उपलब्‍धता ही कमी आहे.

जमिनीचा वापर

जिल्हयातील शेतविषयक पुर्ण सुधारीत आकडेवारी 2002-03 वर्षाकरीता उपलब्ध असूुन, तुलनात्मक दृष्टीने सोईचे होईल म्हणुन समालोचनासाठी अलीकडील या स्थाई आकडेवारीचा उपयोग करण्यात आला आहे. जिल्हयाचे भौगोलीक क्षेत्र 773 हजार हेक्टर असुन त्यापैकी जंगलव्याप्त क्षेत्र 6.5 हजार हेक्टर म्हणजेच 0.84 टक्के आहे. शेतीकरीता उपलब्ध नसलेल्या क्षेत्रामध्ये बिगरशेती वापराखालील जमीन 55.9 हजार हेक्टर म्हणजेच भौगोलीक  क्षेत्राच्या 7.23 % होती. पडीत व लागवडीलायक नसलेली जमीन 15.5 हजार हेक्टर म्हणजेच 2.01 टक्के होती. अशा रीतीने  एकूण भौगोलीक क्षेत्रापैकी 10.00 % जमीन  लागवडीला उपलब्ध नव्हती.  पडीत जमीनीव्यतिरीक्त लागवडीलायक परंतु वापरात नसलेली जमीन 8.2 हजार हेक्टर म्हणजेच 1.05 % होती. कायम गुरे चरण आणि इतर चरणाची जमीन 19.4 हजार हेक्टर म्हणजेच 2.51 % होती. जिल्हयात असलेल्या एकूण गोजातीय पशुधनाच्या मानाने कायम गुरे चरण आणि इतर चरणाचे जमीनीचे क्षेत्र  प्रती पशु 0.03 हेक्टर  म्हणजे फारच कमी होते. कसलेल्या जमीनीत समाविष्ट न झालेली झाडेझुडपा खालील जमीन 2.7 हजार हेक्टर म्हणजेच 0.35 % होती. याखेरीज चालु पड 28.12 हजार हेक्टर (3.64 %) व इतर पड 25.38 हजार हेक्टर (3.28 %) होती. ही सर्व वरील प्रकारे उपयोगात नसलेली जमीन वजा जाता निव्वळ कसलेले क्षेत्र 611 हजार हेक्टर होते, जे लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या 79.08 % होते.

 

पिके व पिक पघ्दती -

या जिल्हयात खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात पिके घेण्यात येतात.  दोन्हीही हंगामात घेतल्या जाणा-या पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र एकदल धान्याचे त्याहुन कमी द्विदल धान्याचे क्षेत्र व त्या खालोखाल तेल वर्गीय पिकाचे क्षेत्र आहे.  ज्वारी बाजरी व गहू ही प्रमुख एकदल धान्य पिके असुून तूर,  मूग, हरभरा ही  प्रमुख द्विदल (दाळवर्गीय) पिके घेण्यात येतात. 2002-03 मध्ये एकूण लागवडीखालील  क्षेत्रापैकी 373900 हेक्टर म्हणजे (63.49 %) जमीन खादयपिकाखाली जमीन होती.  या वर्षात ज्वारी या पिकाखालील क्षेत्रफळ 109600 हेक्टर म्हणजेच एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 18.61 % होते  तर बाजरीचे क्षेत्र 41000 हेक्टर म्हणजे 6.96 % गव्हाचे  क्षेत्रफळ 26800 हेक्टर म्हणजे 4.55 % होते. एकूण तृणधान्याखालील क्षेत्रफळ 238700 म्हणजे 40.53 % होते.  कडधान्याखालील क्षेत्र 128500 हेक्टर म्हणजे 21.82 % येते. गळीताच्या धान्यामध्ये प्रामुख्याने करडई, भुईमुग व जवस ही पिके घेतली जातात. करडईचे पिक रब्बीमध्ये कोरडवाहु जमीनीत बहुूधा ज्वारीच्या पिकाबरोबरच मिश्र पिक म्हणुन घेतले जाते.  नगदी पिकामध्ये ऊस आणि कापूस ही महत्वाची पिके आहेत. सिंचनाच्या सोईमुूळे व जिल्हयातील स्थापन झालेल्या साखर कारखान्यांमुळे ऊसाच्या पिकाखालील क्षेत्रात वाढ होतांना दिसते. कपाशींखालील क्षेत्र 2002-03 साली 291600 हेक्टर म्हणजेच एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 49.52 होते.

पिकउत्पादन व मुख्य पिक उत्पादनाचे प्रमाण -

जिल्हयातील जमीन सर्वसाधारण चांगली असल्याने पुरेसा व वेळेवर पाऊस पडल्यास पिके चांगली येऊ शकतात. जिल्हयात कोरडवाहु जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने पिके व त्यांचे उत्पादन पावसावरच अवलंबुन आहे. 2008-09 या वर्षासाठीच्या अंतिम अंदाजावरुन मुख्य पिकाचे पिकवार एकूण उत्पादन व त्याचे दर हेक्टरी उत्पनाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

बाब

पिके

ज्वारी

गहू 

बाजरी

तूर

हरभरा

मुग

ऊस

कापूस

ताग

लाल मिरची

हळद

भुईमुग

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

1

उत्पादन 00 टन

1555

298

219

232

92

4

 

14524

4183

0

0

0

5

2

 

दर हेक्टरी उत्पादन किलो

956

1665

689

672

617

113

71

249

0

0

0

625

कापसाचे उत्पादन “00” गाठीच्या स्वरुपात आहे. 1 गासडी = 170 कि.ग्रॅ. स्वरुपात.

सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर -

अलीकडच्या काही वर्षात संकरीत व सुधारीत बियाणाच्या वापराबरोबरच सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर होत आहे. जिल्हा परिषद व स्थानिक संस्था यांच्यामार्फत खतांचे वाटप केले जाते. जिल्हयात 2009-10 वर्षात 250308 मे.टन रासायनिक खतांचे वाटप करण्यात आले.

पिक संरक्षण -

विषेत: कापुस या पिकासाठी शेतकरी पिक संरक्षणाची उपाययोजना करतात. जिल्हा परिषदेमार्फत पिकसंरक्षक व रोगप्रतिबंधक औषधांच्या फवारणीच्या मोहीमा हाती घेतल्या जातात व ग्रामपंचायतीमार्फत पिकसंरक्षक औषधीचा पुरवठा केला जातो.

कृषि उत्पन्न बाजार समिती -

जिल्हयात एकूण आठ कृषि उत्पन्न बाजार समित्या असून, त्या जालना, भोकरदन, अंबड, परतुर, जाफ्राबाद, बदनापूर, घनसांवगी मंठा व आष्टी ता.परतूर येथे आहेत. तसेच जालना, अंबड, परतुर, व भोकरदन येथे उपबाजार समित्या आहेत. या अंतर्गत 2009-10 या वर्षात 676373 टन मालाची ऊलाढाल करण्यात आली. व त्याची एकूण किंमत रु. 1820334 हजार इतकी इतकी होती.

सिंचन ओलीताची साधने -

जिल्हयात 2002-03 या वर्षात विहीरीच्या सिंचनाखालील एकूण क्षेत्र 49,774 हेक्टर होते. एकूण निव्वळ कसलेल्या क्षेत्राशी त्याची टक्केवारी 8.91 येते. जिल्हयात मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. औरंगाबाद जिल्हयात पैठण जवळील जायकवाडी या मोठया प्रकल्पाच्या लाभक्षेत्रापैकी 36,175 हेक्टर लाभक्षेत्र जालना जिल्हयात आहे. त्याशिवाय 6 मध्यम प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असुन, त्यांचे लाभक्षेत्र 12057 हेक्टर होते. जिल्हयात 78 लघुपाटबंधारे प्रकल्पाची कामे मार्च 2010 अखेर पूर्ण झाली असुन, त्यापासुन 2009-10 मध्ये  15101 हेक्टर निव्वळ क्षेत्र ओलीत करण्यात आले. 2002-03 साली जिल्हयात 33519 सिंचन विहीरी होत्या, तसेच 68749 विद्युत पंप व 1568 डिझेल पंप सिंचनासाठी वापरात होते.

ओलीताची पिके-

अन्नधान्य पिकापैकी रब्बी हंगामात गहू, ज्वारी व हरभरा ही ओलीताची मुख्य पिके आहेत. 2002-03 वर्षात गहू व ज्वारी या पिकाखालील एकूण ओलीताचे क्षेत्र अनुक्रमे 4.98 % व 23.53 % असे होते. नगदी पिकामध्ये मुख्यत: ऊस व कापुस ही पिके घेतली जातात. ऊसाचे सिंचनाखालील क्षेत्र एकूण ओलीताच्या क्षेत्राच्या 0.50 % तर कापसाचे क्षेत्र 65.99 % होते.

मोठे, मध्यम , लधुसिंचन विकास कार्यक्रम -

             जिल्हयात एकही मोठा प्रकल्प प्रस्तावित नाही. औरंगाबाद जिल्हयातील पैठण/जायकवाडीच्या मोठया प्रकल्पाच्या लाभक्षेत्रापैकी जालना जिल्हयात 36,175 हेक्टर लाभक्षेत्र असुून, बारमाही व हंगामी 2009-10 मध्ये 98822 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणले गेले. तसेच 6 मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम पुर्ण होऊन, 7954 हेक्टर लाभक्षेत्र निर्माण झाले. याशिवाय 78 लघुपाटबंधा-यां- ची कामे पुर्ण झालेली आहेत. लघुपाटबंधा-यांद्वारे 22883 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणले गेले.

पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा व दुग्धव्यवसाय विकास

2007 च्या पशुगणनेनुसार जिल्हयात 778282 एवढे पशुधन होते तर 2003 च्या पशुगणनेनुसार जिल्हयात 868047 एवढे  पशुधन होते. वर्ष 2007 च्या पशुगणनेप्रमाणे जिल्हयात 3 वर्षावरील 108466 गाई होत्या,  अडीच वर्षावरील विदेशी गाईंची संख्या 21806 होती. याच गणनेनुसार जिल्हयात 3 वर्षावरील 214028 बैल होते. एकूण म्हशी व रेडयांची संख्या 48301 होती, त्यापैकी 3 वर्षावरील 47045 म्हशी व 1256 रेडे होते.   जिल्हयात रेडे शेती कामाला अगर वाहतुकीच्या कामाला वापरण्याची पध्दत नसल्याने रेडयांचे प्रमाण कमी आहे.

2007 च्या पशुगणनेनुसार जिल्हयात एकूण 224636 शेळया, 27034 मेंढया, 449674 कोंबडया व बदके होती. दुधासाठी व आहारासाठी कास्तगार शेळया पाळतात तसेच अंडी मिळविण्यापुरत्या कोंबडया व बदके पाळतात.

पशु उत्पादन -

जिल्हयात पशुसंवर्धनाचा  व्यवसाय हा शेती उद्योगाला पुरक व्यवसाय म्हणुन वाढत आहे.  जिल्हयात 2009-10 वर्षात एकूण 437 दुग्ध सहकारी संस्था असुन त्यांचेमार्फत मार्च 2010 अखेर 2415 लक्ष लि. दुधाची खरेदी करण्यात आली. या संस्थांमार्फत संकलीत दुध औरंगाबाद येथील दुध डेअरीला पाठविले जाते.

2009-10 वर्षी 12 नोंदणीकृत पशुवधगृहे होती.  त्यात 14109  मोठी जनावरे व 18684 शेळया व मेंढयांची कत्तल  करण्यात आली.

शासन व जिल्हा परिषदेमार्फत पशु उपचार सोयी उपलब्ध असुन जिल्हयात 2009-10 साली एक पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालये, 93 पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत होती. त्याशिवाय फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय जालना तालुक्यात उपलब्ध आहे. एक विभागीय कृत्रिम रेतन केंद्र कार्यरत होते. वेळोवेळी जिल्हयात होणा-या पशुंच्या साथींच्या रोगावरील उपचार केला जातो व रोगप्रतिबंधक लस जनावरांना टोचण्यात येते. सुधारीत प्रजातीच्या जनावरांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत ग्रामीण भागात कृत्रिम गर्भधारण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रातुन कृत्रिम गर्भधारणाशिवाय जनावरांवर उपचारही केले जातात.

जिल्हयात पशुसंवर्धन कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्याकरीता पशुदवाखाने व पशुउपचारकेंद्रांच्या संख्येत वाढ केली जात आहे.  तसेच भरपुर प्रमाणात दुध उत्पादन होण्यासाठी संकरीत गाईंच्या पैदाशीचा कार्यक्रम जिल्हयात राबविला जातो. त्याचप्रमाणे एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दुभत्या गाई व म्हशींचा पुरवठा होतो. चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणुन वैरण विकास कार्यक्रमही राबविला जातो.

मत्स्यव्यवसाय -

जिल्हयातील मत्स्यव्यवसाय नदीच्या पाण्यात तसेच सिंचन प्रकल्पांच्या गोडया पाण्यात प्रामुख्याने केला जातो.  मध्यम प्रकल्पात मत्स्यबीज संवर्धन करुन मत्स्य उत्पादन केले जाते. जिल्हयात 2009-10 अखेर मत्स्य व्यवसायासाठी  उपयोगात आणलेले एकूण क्षेत्र 7343 हेक्टर असुन 64 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था कार्यरत आहेत. 2009-10  या वर्षात एकूण 354 लक्ष रु. चे 1770 मे.टन भुजल मासे पकडण्यात आले. 90.34 लक्ष मत्स्यबीज उपयोगात आणले गेले. जिल्हयात कटला, रोहा, मिरगळ, सिप्रीनल वगैरेचे मत्स्यसंवर्धन केले जाते. याशिवाय वाम, मरळ, पदम,व आहेर या स्थानिक जातीचे मासे आढळतात.

जिल्हयात मत्स्यव्यवसाय वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने कटला, रोहा, मिरगळ, सिप्रीनल, या जातीचे मत्स्यबीज संबर्धनासाठी वापरले जाते. मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था स्थापन करुन त्यांना सुधारीत बोटी व नायलॉन जाळी इ. साधने पुरविली जातात.

रस्ते वाहतुक व दळणवळण

मनमाड ते काचीगुडा हा एकच रेल्वेमार्ग जालना जिल्हयातुन जातो. जिल्हयातील त्याची लांबी 88 कि.मी. तर रेल्वेमार्गाच्या लांबीचे दर 100 चौ.कि. मी भौगोलीक क्षेत्राशी प्रमाण 1.14 कि.मी. आहे. तर राज्यासाठी हे प्रमाण 1.77 कि.मी. असुन जिल्हयाचे प्रमाण त्यामानाने खुप कमी आहे. तसेच जिल्हयात दर लाख लोकसंख्येस लोहमार्गाची लांबी 5.46 कि.मी. असुन राज्यासाठी हे प्रमाण 5.63 येते.

जिल्हयात  वर्गीकृत रस्त्यांची लांबी 4360.24 कि.मी. इतकी आहे.  त्यापैकी राज्य महामार्ग 1087.00 कि.मी., प्रमुख जिल्हा मार्ग 929.30 व इतर जिल्हा रस्ते 731 कि.मी. आहे. खेडयातील रस्त्याची लांबी 1116 कि.मी. आहे. तर नगरपरिषदेच्या हददीतील रस्ते 464.34 कि.मी. आहेत. वरील सर्व रस्त्यापैकी 2180.61 कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण झालेले असुन, 1745.33 कि.मी. रस्ते खडीचे आहेत. तर वाहन चालविण्यास योग्य अशा इतर रस्त्यांची लांबी 320.91 कि.मी. आहे. एकूण रस्ते विचारात घेता जिल्हयात दर 100 चौ.कि.मी. क्षेत्रामागे रस्त्याची लांबी 56 कि.मी येते, तसेच एकूण रस्ते विचारात घेता जिल्हयात दर लाख लोकसंख्येमागे रस्त्याची लांबी 270 कि.मी. येते.


Jalna District Transportation