पशुसंवर्धन विभाग , जिल्हा परिषद-जालना

संक्षिप्त टिपणी:
        1) जिल्हयात जिल्हा परिषदेचे खालील प्रमाणे पशुवै'किय दवाखाने आहेत.
         2) पशुवै'किय दवाखाना श्रेणी-१ एकुण ३५, वर्ग २ चे अधिकारी गट-अ व गट-ब काम पाहातात.
         3) पशुवै'किय दवाखाना श्रेणी-२ एकुण २३,वर्ग ३ चे कर्मचारी काम पाहातात.
             फिरता पशुवै'किय दवाखाना बदनापुर १, वर्ग २ चे अधिकारी गट-अ काम पाहातात.


एकुण दवाखाने ५९
         या शिवाय जिल्हयातील ५ पंचायत समिती मधे वर्ग २ चे अधिकारी विस्तार काम पहातात. वरिल श्रेणी १ च्या दवाखान्यावर काम पहाणारे वर्ग २ चे अधिका-यां ची २३ पदे ब-याच कालावधी पासून रिक्त आहेत. ५ पंचायत समिती मध्ये वर्ग २ चे अधिकारी विस्तार ५पैकी २ पदे रिक्त आहेत.म्हणजे जिल्हयात एकुण पशुधन विकास अधिकारी वर्ग २ च्या ४२ मंजुर पदा पैकी २५ पदे ब-याच कालावधी पासून रिक्त आहेत.

शासन स्तरावर पदे भरणे बाबत पाठपुरावा चालु आहे.
जालना जिल्हयामध्ये गायवर्ग-४०७६१२, म्हैस वर्ग-८६६७०,शेळया मेंढया-२५१४२८,वराह-५८८६,कोंबडया -२१४०२४, अश्व -१२३ यापप्रमाणे पशुधन आहे.


एकुण पशुधन ५,२१,४९७ आहे.

योजना :
          खात्यामार्फत पशुवै'किय दवाखाने चालविण्या व्यतिरिक्त , खालील प्रमाणे योजना राबविण्यात येतात.
1) जिल्हा वार्षिक योजना सन २०१४-१५ :- पशुवै'किय दवाखाने बळकटीकरण अधुनिकिकरण- ९० लक्ष मंजूर आहेत. त्यातून जवखेडा बु, चिखली येथील नविन पशुवै'किय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
2) पशुवै'किय दवाखान्यांना औषधी पुरवठा :- ३३.७३ लक्ष नियतव्य मंजूर आहे. जिल्हायातील पशुवै'किय दवाखान्यांनांना औषधी पुरवठा करण्यात येत आहे.
3) जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत रु. १.०० लक्ष अनुदानातून १०० टक्के अदानावर बैरण विकासासाठी मका बियाने वाटप करण्यात येत आहेत.
4) एकात्मीक कुक्कुट विकास कार्यक्रमा अंतर्गत १२५ लाभधारकांना सुधारीत जातीच्या कुक्कुटपिल्लाचे गट व खादय देण्यात येत आहे.

कामधेनु दत्तक ग्राम योजना :- रु. ५०.०० लक्ष नियतव्य मंजूर असून ३३ गांवांना लाभ देणार
       1) विशेष घटक योजना सन २०१४-१५
       2) दुधाळ जनावरे गट वाटप रु. ७५.०० नियतव्यय मंजूर असून ११७ लाभधारकांना लाभ देणार
       3) शेळी गट वाटप करणे (१० १) :- रु. ५०.०० लक्ष नियतव्यय मंजूर असून ९३ लाभधारकांना लाभ देणार.
       4) जंतनाशक औषधी पुरवठा करणे :- रु. २०.०० लक्ष नियतव्यय मंजूर असून २० हजार लाभधारकांना लाभ देणार.
       5) दुभत्या जनावरांना खादय पुरवठा :- रु. २५.०० लक्ष नियतव्यय मंजूर असून ३८५० लाभधारकांना लाभ देणार.

पशुसंवर्धन प्रशिक्षण :- रु. ६.०० लक्ष नियतव्यय मंजूर असून ६०० लाभधारकांना लाभ देणार.

विभागाचे नाव :- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परीषद जालना

कार्यालयाचा फोन नं. :- ०२४८२ २२३८८८

ई मेल आय डी :- dahojalna@gmail.com

कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम :- डॉ. बी. आर शिंदे जिल्हा पशुसंर्धन अधिकारी जिल्हा परीषद जालना